0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
मराठवाडयाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेमुळे मराठवाडयाचा कायापालट होऊन मोठया प्रमाणात विकासाला चालना मिळणार आहे. असे मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी आज येथे सांगितले. मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेस मान्यता दिल्याबद्यल मराठवाडा विकास मंडळातील सर्व सदस्यांतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार दर्शक ठराव एकमताने मान्य करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील मराठवाडा विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित मराठवाडा विकास मंडळाच्या सर्वसाधारण बैठकीत समितीचे तज्ञ सदस्य डॉ. कृष्णा बी. लव्हेकर, शंकरराव नागरे, डॉ. अशोक बेलखोडे, मुकुंद कुलकर्णी, भैरवनाथ ठोबंरे, उपआयुक्त (नियोजन) रविंद्र जगताप, तसेच सहसंचालक श्री. भांगे उपस्थित होते. या बैठकीत मराठवाडा विभागाच्या विकासासंदर्भातील मागील बैठकीत दिलेल्या  सुचना व झालेल्या निर्णयावर कार्यवाही करण्याबाबत आढावा घेण्यात आला. तसेच तज्ञ सदस्यांनी मांडलेल्या विकासाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात येऊन त्यासंबधी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश श्री.कराड यांनी दिले.
डॉ. कराड म्हणाले की, मराठवाडयात पावसाच्या अनियमितपणामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी मराठवाडयासाठी वॉटर ग्रीड योजना, मराठवाडयासाठी कोकणातील पाणी उपलब्ध करुन देणे, येथील नदयाजोड प्रकल्पास मान्यता देणे, औरंगाबाद शहरास शाश्वत पाणीपुरवठा होण्यासाठी 1,680 कोटीच्या योजनेस मान्यता दिली. तसेच मराठवाडयातील उद्योगांसाठी विशेषदर सवलत पुढील तीन वर्षासाठी  व उद्योगांना पुढील पाच वर्षासाठी इलेक्ट्रीसीटी डयुटी सवलत आणि मराठवाडा व विदर्भातील उद्योगांसाठी डी-प्लस तालुक्यांपेक्षा अधिक प्रोत्साहनपर निधी मंजूर केल्यामुळे मराठवाडयातील उद्योग उभारीसाठी व सक्षमीकरणासाठी चालना मिळणार आहे. 
तसेच यावेळी मराठवाडयातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी औरंगाबाद येथे आयआयटी स्थापन करण्याचा तसेच ऐतिहासिक पर्यटन व सांस्कृतिक केंद्रीय विद्यापिठासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनास लवकरच सादर करणार असल्याचे श्री. कराड यांनी सांगितले.यावेळी मराठवाडा विकास मंडळास प्राप्त 50 कोटी विशेष निधीच्या अनुषंगाने जिल्हयांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा आढावा घेण्यात येऊन चर्चा करण्यात आली. तसेच मराठवाडयातील आठही जिल्हयाच्या विकासासाठी निधीची मागणी शासनास करणार असल्याचेही श्री.कराड यांनी सांगितले.

Post a comment

 
Top