0
BY - रविंद्र राऊत,युवा महाराष्ट्र लाइव – यवतमाळ |
विदर्भातील एकमेव महालक्ष्मी मंदिर असलेल्या देऊळगाव (वळसा) ता. दारव्हा येथे गौरी पूजनाच्या अनुषंगाने शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या महाआरतीस महसूल राज्यमंत्री संजय राठोड, शीतल राठोड यांची प्रमूख उपस्थिती राहणार आहे. देऊळगाव (वळसा) येथील महालक्ष्मी मंदिरात सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. श्री महालक्ष्मी संस्थान, ग्रामपंचायत व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. यावेळी ना. संजय राठोड यांच्या प्रयत्नातून येथे तयार करण्यात आलेल्या निसर्ग पर्यटन केंद्राचा लोकार्पण सोहळा तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. तसेच जिल्हा परिषदेचे नवनियुक्त सभापती कालिंदा पवार, गजानन बेजंकीवार यांच्यासह डॉ. विष्णू उकंडे, जिजाबाई भगत, डॉ. महेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ‘माहेरची साडी’ फेम अभिनेत्री अलका कुबल पहिल्यांदाच महालक्ष्मीच्या दर्शनाकरीता व महाआरतीकरीता येथे येत आहेत. यावेळी त्या भाविकांशी संवादही साधणार आहेत. या महालक्ष्मी माता यात्रा महोत्सवात भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a comment

 
Top