0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्याच्या विधानसभा निवडणुका लढवणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यादरम्यान राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. इतकंच नाही तर राज ठाकरेंनी आपली ईडी चौकशी का झाली, त्यामगचं कारणही सांगितलं. विरोधाची भूमिका मी घेतली होती. निवडणूक लढवावी की नाही या विचारात मी होतो. विरोधाबाबत मी अनेक नेत्यांना भेटलो. सोनिया गांधी, ममता बनर्जी यांची भेट घेतली. पण कालांतराने कुणीही ठोसपणे पुढे आले नाही. मी अनेकांशी या विषयावर बोललो, त्यानंतर आपण एकट्यानेच निवडणुकीवर बहिष्कार का टाकावा ? असा विचार केला. पक्षात अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत आहोत. असं राज ठाकरे म्हणाले.

Post a comment

 
Top