0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नागपूर |
गणेशोत्सव शहरातील विविध भागात मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात येत असून यानिमित्त विविध सार्वजनिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन येथे सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. तसेच गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन सामूहिक आरतीत सहभागी झाले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नरेंद्र नगर, सुंदरवन येथील सार्वजनिक गणेशोत्सवास भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी सुख व समृध्दी नांदू दे तसेच या उत्सवाचा आनंद व्दिगूणीत होऊ दे अशी मागणी त्यांनी बाप्पांकडे केली. यावेळी लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी,  अविनाश ठाकरे,विशाखाताई मोहोड, पंकज थोरात, आदी उपस्थित होते.त्यानंतर मनीष नगर येथे आश्रय उत्सव समितीतर्फे प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशाचे दर्शन केले. आश्रय मंडळाच्यावतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाला ३१ हजाराचा धनादेश मंडळाच्यावतीने अध्यक्ष श्री. मोझरकर यांनी  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला. श्याम नगर येथील एकता गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्रीचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Post a comment

 
Top