0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह – मुंबई
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी होईल. विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra Fadnavis) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री म्हणाले, निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या सर्वात मोठ्या महोत्सवाची घोषणा महाराष्ट्रामध्ये केली आहे. मी निवडणूक आयोगाचे आभार मानतो आणि या घोषणेचे स्वागत देखील करतो.

Post a comment

 
Top