BY – युवा महाराष्ट्र लाइव – सांगली |
‘आयएसओ’ मानांकन म्हटले, की एखादा
उद्योग-व्यवसाय डोळय़ांसमोर उभा राहतो. पण सांगली जिल्हय़ात हे मानांकन चक्क एका शाळेने
मिळवले आहे आणि ही गुणवत्तेचे मानांकन मिळवणारी शाळादेखील जिल्हा परिषदेची सरकारी आहे.
सांगली जिल्ह्य़ाच्या पूर्व भागातील पांडोझरीनजीक वाडीवस्तीवर १९९८ साली सुरू
झालेल्या बाबरवस्ती शाळेची ही यशोगाथा आणि या यशोगाथेचे किमयागार आहेत दिलीप मारोती
वाघमारे हे शिक्षक!तासगावनजीक तुरची व मिरज येथिल विकासनगर व गायकवाड मळा येथे एका
बहुशिक्षकी शाळेने ‘आयएसओ’ मानांकन मिळवल्याची वाघमारे गुरुजींच्या वाचनात आले. आणि
प्रत्यक्ष शाळेला पालकांना घेवून भेट दिली याच वेळी त्यांनी आपल्या या शाळेलाही हे
मानांकन मिळवण्याची जिद्द मनी बाळगली. या जिद्दीने पेटलेल्या वाघमारे गुरुजींनी आसपासच्या
वाडीवस्तीवरील लोकांना एकत्र करून ही कल्पना सुरुवातीस मांडली आणि सारे ग्रामस्थच या
कार्यात सहभागी झाले.
या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे ४० विद्यार्थी शिक्षण घेतात. बहुतेक मुलांचे
पालक शेतकरी व शेतमजूरच आहेत. ‘एक दिवस शाळेसाठी’ अशी घोषणा देऊन या साऱ्या पालकांनी
शाळेसाठी मदतीचा हात पुढे केला. शाळेच्या प्रत्येक सुधारणेसाठी अगोदर श्रमदान आणि मग
उरलेल्या कामासाठी निधिसंकलन हे सूत्र ठरले. रोज कष्ट करावेत तेव्हा हातातोंडाची गाठ
पडणाऱ्या या कष्टकरी समाजानेही या शाळेसाठी सुमारे १लाख ९२हजार रुपये उभे केले. गावातील
आण्णासाहेब गडदे यांनी शाळेसाठी जागा मोफत दिला. संख मधील शेतकरी श्रीशैल येळदरी,डॉ.संभाजी
जाधव,डॉ.भाऊसाहेब पवार ,शिक्षक व पालक व ग्रामस्थ
व अधिकाऱ्यांनीही मग सहकार्याचा हात पुढे केला. बाबरवस्तीची ही शाळा दोन शिक्षकी आहे. चौथीपर्यंतचे
वर्ग आणि एकच शिक्षक, यावर वाघमारे गुरुजींनी
मार्ग काढत चौथीच्या विद्यार्थ्यांमधील हुशार १६ मुले वेगळी करत त्यातील एकेका मुलास
दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गटावर नेमण्यात आले. शिक्षणापेक्षा स्वयंअध्ययनावर
या शाळेत भर दिला जातो. अभ्यासाबरोबर परिसर अभ्यासातून ही मुले जास्तीतजास्त शिक्षण
घेण्याचे काम करतात. साधे शाळेपुढची बागदेखील विविध वनस्पतींची माहिती देणारी तयार
करण्यात आली आहे. ही मुले गांडूळखत, शेती, संगणक शिक्षण आदी उपक्रमांतही सहभागी असतात.
या प्रत्येक आकलनासाठी मुलांना ‘स्वाध्याय कार्ड’ देण्यात आलेले आहे. शाळेतच वृत्तपत्रांचे
वाचनालय सुरु करण्यात आलेले आहे. यामध्ये दैनिकांचे वाचन तर घडतेच पण चालू विषयांवर
मुलांमध्ये चर्चाही घडते.मुलांचा केवळ शैक्षणिक विकास हे उद्दिष्ट न ठेवता क्रीडा,
सांस्कृतिक क्षेत्रातही मुलांना प्रगत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत. मुलांना चारभितींच्या आत मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात वास्तवतेशी
निगडित शिक्षण देण्याचा प्रयत्न या शाळेत होत आहे.. हे मानांकन प्रदाकरताच मुख्याध्यापक,
सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. शैक्षणिक क्रांतीसाठी शाळा सज्ज झाली आहे,
असा विश्वास मुख्याध्यापक दिलीप वाघमारे व्यक्त केला.यावेळी शालेय समितीचे अध्यक्षा
सविता बाबु मोटे, सरपंच जिजाबाई कांबळे ,उपसरपंच नामदेव पुजारी व सर्व ग्रामपंचायत
सदस्य ,मातापालक,शिक्षक पालक,यांनी आय एस. ओ.मानांकनासाठी कष्ट घेतले.जत पंचायत समितीचे सभापती सुशिला तावशी,उपसभापती
आडव्याप्पा घेरडी,मनोज जगताप पंचायत समिती सदस्य , तमण्णागौडा रवि पाटील शिक्षण व आरोग्य
सभापती जिल्हा परिषद सांगली,तमन्नगोंडा ,सरदार पाटील जि.प. सदस्य सांगली,गटविकास अधिकारी
डी.बी.खरात,गटशिक्षणाधिकारीबी.एम. जगधने,शिक्षण विस्तार आर.डी.शिंदे,केंद्र प्रमुख
रमेश राठोड,रामचंद्र राठोड,सर्व पं.स.सदस्य ,जि.प.सदस्य ,पालक ,ग्रामस्थ सर्व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. अग्रणी परिक्षक एस.व्ही. चौधरी आदींचा समावेश होता
Post a comment