0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – उरण |
उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. आग अजूनही विझलेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. गंभीर जखमी झालेल्या कामगारांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे वृत्त आहे.लिक्विड गळतीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. उरण ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये रात्रीपाळीचे कामगार काम करत होते. यामधील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्लांटमध्ये नेमके किती कामगार कामावर होते याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. मात्र सर्व कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे.

Post a comment

 
Top