0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - डोंबिवली   
डोंबिवली पूर्व व पश्चिमेला जोडणारा केापर ब्रीज आज संध्याकाळी 6 नंतर बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी ठाकुर्ली उडडाणपूलाचा वापर करावा, रेल्वे प्रशासनाने केडीएमसीला कोपर ब्रीज बंद करण्याची नोटीस बजावल्यानंतर शुक्रवारी केडीएमसीने ब्रीजवरील वाहतूक बंद करण्याची सुचना वाहतूक विभागाला केली होती. वाहतुकीच्या दृष्टीने कमकुवत झाल्याने कोपर ब्रीज 28 ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. मात्र हा पूल बंद झाल्यास शहरात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागणार असल्याने लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला होता. मात्र, त्यानंतर पुलावरील अवजड वाहनांवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. आज सायंकाळ पासून हा पूल पूर्ण पणे वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. यामुळे मोठया प्रमाणात वाहतूक होणार असून नागरिकांना या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.




Post a comment

 
Top