0

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
     जातीपाती न मानता पक्षासाठी आणि जनसामान्यांच्या सेवेसाठी रात्रंदिवस कार्यात मग्न राहून विविध प्रश्‍न मार्गी लावले.विविध योजना राबवून कित्येक समाजकार्य केले त्यामुळे माजी सिडकोध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचा राजकारण विरहीत माणुस धर्म जपण्याचा महत्वपुर्ण व सिंहाचा वाटा ठरला आहे. माजी सिडकोध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी आपल्या आयुष्यात कित्येक समाजकार्य करून समाजाला देणं म्हणून जो शब्द दिला तो पुर्ण करण्यात त्यांना यश आले आहे त्यामुळे त्यांचा एकच शब्द आणि गिनती करता येणार नाही असे कार्य बेभान झाले आहे.सुखःच्या वेळी तर सर्वच येतात परंतू दुखःच्या वेळी मायेची ऊब आणि आपुलकीची झरी म्हणून माणुस धर्मच येतो असाच माणूसधर्म जपण्याचा मुलमंत्र प्रमोद हिंदूराव यांच्याकडून वेळोवेळी दुखःच्या प्रसंगी त्यांच्या कार्यसिध्दीतून समोर आला आहे. प्रमोद हिंदुराव यांनी कधीही कोणाला नाराज केले नाही.नेहमी आनंद,उत्साह मिळत राहो आणि कुठेतरी आपल्या मदतीचा हातभार लाभावा या उद्देशाने सढळ हातानी मदत केली कारण मदत हीच खरी माणूसकी आहे असे त्यांचे मत आहे.प्रमोद हिंदुराव यांच्यातील कर्तृत्वान महामेरू,न्यायकरी अशी तीन ख्याती नागरिकांच्या हृदयात स्थान मिळवून देणारी ठरली आहे.त्यांच्यामते नैतिकता टिकवली म्हणजे माणूसकी जगवणे होय.विश्‍वासाने,आदराने ज्येष्ठांचा सल्ला घेत राजकीय क्षेत्रात उंचभरारी घेत यशस्वी क्षितीज गाठण्याचा मानस त्यांना मिळाला आहे.
     
     निवडणूका आल्या म्हणून जनतेसमोर कधी येत नाही तर समस्या जाणून घेण्यासाठी स्वतः जनसामान्यांच्या पातळीवर जाऊन समस्यामुक्त म्हणून खारीचा वाटा त्यांनी कित्येक वर्षापासून उचलला आहे आणि हेच सत्य तमाम जनतेला माहिती आहे.विकासाला गती देणारे प्रमोद हिंदुराव आज नवतरूणांच्या गळयातील तावीत बनले आहे.वेळोवेळी त्यांनी नितीमुल्य जपण्याची गुणवत्तचे मार्गदर्शन प्रत्येकांच्या मनात आणि ध्यानात छाप करून आहे.अलीकडे राष्ट्रवादीतील काही पदाधिकारी,खंदेसमर्थक सोडून गेले असा प्रश्‍न विचारला असता त्यांनी कोणीही कुठेही गेले तरी हरकत नाही.माझ्या पाठिवर आणि डोक्यावर शरद पवार साहेबांचा अशिर्वाद आहे त्यामुळे मी पवार साहेबांशी एकनिष्ठ राहून शेवटच्या श्‍वासापर्यंत राष्ट्रवादी सोडून गेलेल्या समर्थकांशिवाय जनसामान्यांच्या प्रश्‍नाला उत्तर मिळवून देऊन त्यांची सेवा करण्यात तत्पर राहिल कारण हक्क आणि निश्‍चय या नाण्याच्या दोन बाजू आहेत असे उदाहरणही त्यांनी दिले.
प्रमोद हिंदुराव यांनी कधी नावाचा धुरा केला नाही तर सर्वसामान्यांवर अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवून न्याय मिळवण्यात व खोटया आश्‍वासनाला सडेतोड उत्तर देण्याचा धुरा उडवला आहे.महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हयात,तालुक्यात त्यांनी धार्मिक,सांस्कृतिक उपक्रम राबवून आपली संस्कृती जपली आहे.खिशात हात घालणारा नेता आजपर्यंत कोणी बघितला नसेल आणि जर बघितला असेल तर प्रमोद हिंदुराव या व्यक्तीमत्वासारखा नसेल असेही नागरिकांनी आमच्याशी बोलतांना सांगितले.
     

     नुसते रस्ते बनवून विकास होत नसतो तर घरामध्ये चुल पेटली पाहिजे त्यासाठी त्या घरातील मुलगा असो व मुलगी तिला शासकीय नोकरी मिळाली तरच खर्‍या अर्थाने विकास म्हणता येर्इल अन्यथा विकास कशाला म्हणायचा याच बोधच जनतेला होणार नाही.विकास जनतेचा करावा पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा नको असा टोलाही त्यांनी विरोधकांना प्रसिध्दी माध्यमातून दिला आहे.येत्या विधानसभेला त्यांनी आमदारकीसाठी उभे राहावे व निवडून यावे अशी नागरिकांची इच्छा असून नवा चेहरा काया पालट करणारा आणि बेराजगारी हटवणारा तर मिळेल अशा प्रतिक्रिया तरूणांनी दिल्या आहेत.
-------------------------------------------------------------
- तरूणार्इची साथ प्रतीक प्रमोद हिंदुराव -
     तरूणांसाठी पुढाकार घेत प्रतीक प्रमोद हिंदुराव यांनी एक पाऊल पुढे टाकले असून बेरोजगारी दूर करण्याचा निश्‍चय मनात बाळगला असून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठांच्या आशिर्वादाने सुशिक्षित तरूणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून त्यांना त्यांच्या कुटूंबासाठी मेहनत करून सन्मानाची तरी भाकरी मिळवून देण्याचा विश्‍वास मनात बाळगले असल्याच्या भावुक भावना प्रतीक प्रमोद हिंदुराव यांनी व्यक्त केल्या.


Post a comment

 
Top