0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
एसटी महामंळामध्ये आता विद्युत (इलेक्ट्रीक) बस दाखल होत आहेत. देशातील अशा पहिल्या बसचे आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात लोकार्पण करण्यात आले.
एकदा चार्ज केल्यानंतर किमान ३०० किमीचा पल्ला गाठणारी ही बस नजिकच्या दोन शहरांमध्ये चालवली जाणार आहे. एसटीमध्ये लवकरच अशा साधारण १५० बसेस दाखल होत आहेत. ‘अशा पर्यावरणस्नेही बसेस एसटी महामंडळात दाखल करण्याची सुरुवात करुन मंत्री श्री. रावते यांनी एसटीचा कायापालट करण्याच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकले आहे’, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. ठाकरे यांनी यावेळी केले. ‘शिवनेरी, शिवशाही आणि विठाई बसच्या यशानंतर आज सुरु करण्यात आलेली विद्युत बस ही 'शिवाई' नावाने ओळखली जाईल’, अशी घोषणा मंत्री श्री. दिवाकर रावते यांनी यावेळी केली.


Post a comment

 
Top