0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
सासरा लगट करीत असल्याची तक्रार पत्नीने पतीकडे केली. त्यावेळी वडिलांसाठीच तुझ्याशी लग्न केले आहे त्यामुळे तू त्यांच्या इच्छे प्रमाणे वागतजा असा अजब सल्ला पतीने पत्नीला दिला. या प्रकरणी पती आणि सासऱ्याच्या विरोधात चिखली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 36 वर्षीय विवाहितेच्या फिर्यादी वरून 40 वर्षीय पती आणि 65 वर्षीय सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांन कडून मिळालेल्या माहिती नुसार 20 मे 2018 ते 16 सप्टेंबर 2018 या कालावधीत ही घटना चिखलीच्या सानेवाडी परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सासरी नांदत असताना आरोपींनी माहेराहून पैसे आणावेत या कारणासाठी शाररिक व मानसिक छळ करण्यात आला. तसेच फिर्यादी यांचे पती कामावर गेल्यानंतर घरात रहात असलेले सासरे कशाचा तरी बहाणा करून फिर्यादी यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करीत असत
ही बाब फिर्यादीने आपल्या पतीला सांगितली असता पतीने फिर्यादिस सांगितलंत की“तुझ्याशी लग्न हे माझ्यासाठी केलेले नसून वडिलांसाठी केले आहे. त्यामुळे तू त्यांच्या इच्छेप्रमाणे राहत जा, असे सांगून त्या दोघांनीही आपसांत संगनमत करून फिर्यादी यांच्याशी भांडण केले. तसेच त्यांना माहेरी पाठवून घटस्फोटाची मागणी करणारी नोटीस आरोपीने पाठविली.याबाबत पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत करीत आहेत.

Post a comment

 
Top