0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कुणाच्या पोस्टला जास्त लाईक्स मिळतात याची स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेकदा त्यातून इतरांचा द्वेष करणे अथवा आपल्याला लाईक्स मिळाले नाही म्हणून निराश होण्याचं प्रमाणही वाढत आहे. फेसबुकवर हे ‘लाईक वॉर’ सर्वाधिक पाहायला मिळतं. या लाईक्सच्या नंबर-गेममध्ये अनेक युजर्स डिप्रेशनचेही शिकार झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करुन फेसबुक आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्टखाली दिसणाऱ्या लाइक्सची संख्या हटवण्याचा विचार करत आहे.फेसबुकने याबाबत काम करण्यास सुरुवात केली आहे. याची प्रायोगिक सुरुवात 27 सप्टेंबर रोजी सर्वात आधी ऑस्ट्रेलियात होणार आहे. याची अंमलबजावणी झाल्यानंतर पोस्ट करणाऱ्याला लाईक आणि रिअॅक्शन काऊंट पाहता येईल, मात्र इतरांना हे दिसणार नाही. इतरांना केवळ म्यूचुअल फ्रेंडच्या नावासह रिअॅक्शन आयकॉन दिसतील. अशाप्रकारे इतर फेसबुक यूजर एकमेकांच्या पोस्टवरील लाईकची संख्या पाहू शकणार नाही. त्यामुळे लाईकची स्पर्धा कमी होण्यास मदत होणार आहे.

Post a comment

 
Top