BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
भारतात एकेकाळी बुलेटप्रुफ जॅकेट नसल्यामुळे अधिकारी शहीद झाल्याचा
आरोप झाला होता (Bulletproof jacket). मात्र तोच भारत आज जगातील 100 देशात 360 डिग्री
सुरक्षा देणारे जॅकेट (India exports bulletproof jackets) निर्यात करत आहे. सर्वात जास्त जॅकेट निर्यात करणाऱ्या देशांच्या
यादीत भारत चौथ्या स्थानी आला आहे. ही बाब भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. भारताने आपल्या
निकषांनुसार 360 डिग्री सुरक्षा देणाऱ्या बुलेटप्रूफ जॅकेटची निर्यात 100 पेक्षा जास्त
देशात करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये काही युरोपीय देशांचाही समावेश आहे. अमेरिका,ब्रिटन
आणि जर्मनीनंतर राष्ट्रीय स्टॅण्डर्ड असलेलं बुलेटप्रूफ जॅकेट असलेला भारत चौथा देश
आहे. हे जॅकेट 360 डिग्री सुरक्षा देतं.
Post a comment