0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
गेल्या काही दिवसांत मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्स ची विक्री होत असल्याचे समोर आले होते. कॉलेज तरुण-तरुणी याला बळी पडत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार दहशतवादी विरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नवी मुंबई आणि विक्रोळी परिसरात छापेमारी करून तब्बल 53 करोड रुपयांचे मैफिड्रीन नावाचे ड्रग्स जप्त केले आहे. याप्रकरणी एकूण 5 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली असून अधिक तपास एटीएसकडून सुरू आहे.दहशतवादी विरोधी पथकाच्या विक्रोळी कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार मैफिड्रीन नावाचे अमली पदार्थ भांडुप पंपिंग स्टेशन परिसरात आणणार असल्याचे समजले होते. त्यानुसार सापळा रचून एटीएसने दोघांना 9 किलो मैफिड्रीन सोबत अटक केली. तपासदरम्याम त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हे मोठे रॅकेट असून यामध्ये आणखी आरोपींचा समावेश असल्याची माहिती मिळाली. या गुन्ह्यात एटीएसने आतापर्यंत अब्दुल रझाकी शेख (47), इरफान शेख (43), सुलेमान शेख (28), नरेश म्हसकर (44), जितेंद्र परमार्थ या आरोपींना अटक केलेली आहे.

Post a comment

 
Top