0
BY – गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव – सातारा |
आजच्या महागार्इच्या काळात कुटूंबाचा गाडा चालवण्यासाठी पुरूषांबरोबर स्त्रियांनीही नोकरी अथवा लघुद्योग केले पाहिजेत.बचतगटाच्या माध्यमातून महिला आर्थिक सक्षम होवू शकतात महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले बहुउद्देशीय स्वयंसहायता महिला बचतगट फेडरेशनच्या अध्यक्षा श्रीमंत छत्रपती सौ.वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.फेडरेशनच्यावतीने शनिवार पेठेतील वार्ड क्र.16 मधील बचतगट आणि महिलांसाठी सौ.शितलतार्इ तुपे यांच्यामार्फत ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी सौ.वेदांतिकाराजे भोसले  बोलत होत्या 

Post a comment

 
Top