0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – जयपूर |
काळवीट शिकार प्रकरणी आज (27 सप्टेंबर) बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आज जिल्हा सत्र न्यायलयात सुनावणी होणार आहे.काळवीट शिकार प्रकरणात  जोधपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाकडून सलमान खानला पाच वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पण शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच त्याला जामीनही मंजूर करण्यात आला होता. पण सुनावणी दरम्यान, सलमानला न्यायालयात उपस्थित राहावे लागेल, असे आदेशही न्यायालयाने दिले होते. गेल्या सुनावणी दरम्यान सलमान न्यायलयात हजर राहिला नव्हता. त्यानंतर, न्यायाधिशांनी सलमानच्या वकिलांना खडसावले होते. नंतरच्या सुनावणी दरम्यान सलमानने उपस्थित राहणे गरजेचे आहे. तसेच जर तो सुनावणी दरम्यान उपस्थित राहिला नाही, तर त्याचा जामीन रद्द करण्यात येईल, अशी ताकीदही न्यायाधिशांनी दिली होती.

Post a comment

 
Top