0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
संस्कार प्रतिष्ठान आणि डॉ डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवामध्ये संपुर्ण ११ दिवस चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सायंकाळी ४ ते रात्री १२ पर्यंत बंदोबस्ताला व चौकातुन वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष पोलीस अधिकारी म्हणुन १८० सभासद मदत करत होते 
महिला बचत गट आणि डॉ वाय पाटील फार्मसी महाविद्यालय एन एस एस चे ८० विद्यार्थी सहभागी झाले होते चाफेकर चौकापासुन ते थेरगाव पुल बिर्ला हास्पिटल रोड घाटापर्यंत आणि मोरया गोसावी मंदिर घाट,चिंचवड स्टेशन ते चाफेकर चौकापर्यंत असा बंदोबस्त केला अनंतचतुर्दशीच्या दिवशी चाफेकर चौकात मिरवणूक शांततेत पारडण्यासाठी मदत केली पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन साहेब आणि अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे साहेब पोलीस उपायुक्त स्मिता पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव आणि चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे या सर्वांच्या मार्गदर्शनाली हा बंदोबस्त केला

Post a comment

 
Top