0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यात ९ कोटी ६४ लाख घनमिटर गाळ काढण्यात यश आले आहे. यामुळे ५२७० धरणे स्वच्छ झाली आहेत.मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त धोरणाच्या अंमलबजावणीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. धरणात गाळ सतत साचत राहिल्याने त्यांच्या पाणी साठ्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला होता. २०१४ पासून या योजनेला गती देण्यात आली.धरणातील गाळ काढण्याच्या या उपक्रमामुळे ४७ दशलक्ष घनमीटर पाणी साठ्यात वाढ झाली आहे. हा गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला असून त्यामुळे १.२५ लाख हेक्टर शेतजमिनीच्या सुपिकतेत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Post a comment

 
Top