0
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
आज कित्येक महिलांवर अन्याय अत्याचार होत असून त्यांना न्याय देण्यासाठी नारीशक्तीच्या रूपात नितातार्इ खोत यांचे नाव चांगलेच सध्या चर्चेत आहे.प्रत्येक महिलांच्या समस्यावर मात करण्यासाठी पुढाकार घेत महिलांचे आधारस्तंभ समाजसेविका म्हणून नितातार्इ खोत यांनी विविध कार्याशीलतेतून समोर आणले आहेत.महिलांचे विविध प्रश्‍न जाणून त्या प्रश्‍नाचे उत्तर मिळवून देण्यासाठी शासन दरबारी जाऊन नैतिकता आणि नीतीमत्ता जपली आहे.आजच्या युगात आपलाच आपला होत नाही असावेळी ज्वलंत ज्योत जी आपल्या अंधारात उजेड आणते अशा रूपातील माणसे कमीच असतात की जे दुसर्‍यासाठी जगतात अशाच जगण्याला जेव्हा अर्थ सापडतो तो अर्थ म्हणजे अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून समोरच्याला झुकवणारी समाजसेविकेच्या रूपात जन्म घेते अशा समाजसेविका बरेच आहेत असांमध्ये नितातार्इ खोत यांचे नाव समोर आले आहे.डोक्यावर आणि पाठीवर थाप असावी लागते असे म्हणतात परंतू निताताईंनी मोठया बहिणीची जबाबदारी सांभाळत महिलांच्या मायेची सावली बनल्या आहेत.थाप महत्वाची नाही कारण थाप सर्वकाळ नाही राहत परंतु आपल्यासोबत सावली ही मरेपर्यंत राहते अशा शिकवणीने महिलांचे आधारस्तंभ असलेल्या नितातार्इ खोत यांच्या कार्याविषयी संपुर्ण महाराष्ट्रात चर्चा असताना पुढील वाटचालीत हजारो महिलांची साथ त्यांच्या सोबत असणार आहे.जाब विचारण्याज्रिता कोणी तरी पुढे आले पाहिजे आणि महिला कोणत्याच बाबतीत कमी नाही हे लवकरच त्यांच्या समाजसेवि कार्यातून दिसून येणार आहे.


Post a comment

 
Top