0
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड तालुक्यात रेशनिंग धान्यपासून रॉयल्टीचोरीला उधान देणार्‍या तहसिलदार सचिन चौधर यांच्या कालावधीत मुरबाड तहसिलदार कार्यालयात कित्येक भ्रष्टाचार घडलेले असताना कित्येक तक्रारींना पायदळी तुडवून माहिती अधिकाराची कुरघडी केली आहे.प्रशासन विभाग म्हणून तालुक्यात तहसिलदार प्रशासक म्हणून पाहिले जात असताना आपल्या पदाचा गैरवापर करण्याचा धाडस तहसिलदार सचिन चौधर यांनी केला आहे.कित्येक तक्रारी करण्यात आले परंतू नागरिकांच्या समस्यांचे आजतागायत निराकरण झाले नसून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाला उत्तर न दिल्याने शासनास त्यांच्या कारनाम्याची लेखाजोखा प्रसिध्दी माध्यमातून प्रसिध्दी केली असताना वरिष्ठ अधिकारी यांनी पाठिशी घातल्याने मॅनेजचा बादशाहा म्हणून तहसलिदार सचिन चौधर यांच्यावर कोणत्याही प्रकारे चौकशीचे आदेश झाले नाही.रेशनिंगचा भ्रष्टाचार झाला तरी भार्इवर कारवार्इ शुन्य,रॉयल्टी चोरी,सुरूंग लावून धमाका,शेतकर्‍यांच्या कुळाच्या जमिनी,निराधार महिलांना पेंशन,मतदार यादीत घोळ,जलशिवार प्रकल्पात भ्रष्टाचार,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनधिकृत गाळयांची चौकशी दाबली,स्वामी नरेंद्र रेसिडेन्सी अनधिकृत इमारत,अरूणोदय इमारत चौकशीवर निर्णय नाही अशा अन्य प्रताप करणार्‍या मॅनेजचा बादशाहा तहसिलदार सचिन चौधर यांच्या हप्तेबाजी घेण्यामुळे सामान्यांकडे लक्ष घातलेच नाही त्यांच्या कालावधीतील प्रत्येक कामाची चौकशी करून त्यांची इडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक संघटनेनी शासनाकडे केली आहे.

Post a comment

 
Top