0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - कोल्हापूर 
फेटे बांधून फुलांची उधळण ढोल ताशांच्या निनादात औक्षण करत कोल्हापूरकरांनी पोलंडवासियांचे वळीवडे येथे स्वागत केले. ऐतिहासिक आणि भावनिक सोहळ्यात पोलंडवासियांनी आपल्या स्मृतींना उजाळा दिला. या भावनिक नात्याबरोबरच कोल्हापूर परिसरात उद्योग, व्यवसाय, सांस्कृतिक, पर्यटन यामध्ये आदान-प्रदान केले जाईल. दिल्लीप्रमाणे वार्सा ते मुंबई थेट हवाई वाहतूक सुरु करु, असे आश्वासन पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री मार्सीन प्रीझीदॅज यांनी दिली.
वळीवडे येथील छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कूलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाचे अनावरण श्री. प्रीझीदॅज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, आमदार सतेज पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पोलंडचे राजदूत ॲडम बूरॉकोस्की, पोलिश एअरलाईनचे अध्यक्ष मिल्झाक्झार्स्की, कौन्सुल जनरल डॅमियन आयर्झीक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल  आदी उपस्थित होते.

Post a comment

 
Top