0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणूनदिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे 6800 कोटी रुपयांचे पहिले ज्ञापन (मेमोरेंडम) पाठविण्यात आले असून केंद्रीय पथकाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर आता सविस्तर ज्ञापन सादर केले जाणार आहे. केंद्राच्या मदतीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत.त्याची अंमलबजावणी राज्य शासनाकडून सुरू आहेअसे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले.सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे महसूल मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पथकातील सदस्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह राज्याच्या विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय पथकातील सदस्यांनी पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष पाहणी दरम्यान आढळलेली निरीक्षणे नोंदविली.

Post a comment

 
Top