0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – वर्धा  |
माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर तिघे गंभीर जखमी आहेत. हंसराज अहीर सुखरूप आहेत. वर्धा जिल्ह्यातील कांडळीजवळ आज सकाळी साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला. काफिल्यातिल वाहन कंटेनरला धडकले. जखमींना तात्काळ नागपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते.

Post a comment

 
Top