0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
चांद्रयान-2 च्या संदर्भात एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. विक्रम लँडर नियोजित जागेच्या जवळ उभे आहे. तसेच त्याचे नुकसान झालेलं नाही. ते चंद्राच्या पृष्ठभागावर ते थोडं तिरके उभे असल्याची माहिती माहिती इस्रोच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. विक्रम सुरक्षित असल्यामुळे आता त्याच्यासोबत संपर्क होण्याच्या आशा वाढल्या आहेत. या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, 'विक्रमने हार्ड लँडिंग केली आहे. तसेच ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने जे छायाचित्र पाठवले आहे, त्यानुसार विक्रम नियोजित स्थळाजवळ उभे असल्याचे समजते. तसेच ते सुरक्षित आहे तुटलेले नाही.'तसेच इस्रोचे माजी प्रमुख माधवन नायर यांनी ही माहिती मिळाल्यानंतर सांगितलं की, विक्रमशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याची अजूनही 60-70 टक्के शक्यता आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. 

Post a comment

 
Top