0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार आहेत. दरम्यान, पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे.  या पार्श्वभूमीवर बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयाजवळ सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी 144 कलमान्वये जमावबंदी लागू केली आहे.

Post a comment

 
Top