0
BY - रविंद्र राऊत,युवा महाराष्ट्र लाइव – यवतमाळ |
सध्या गणेशोत्सवात प्रदूषण आणि पर्यावरण ह्या दोन गोष्टी दुर्लक्षित करून चालत  नाहीत त्याला पर्याय म्हणजे इको फ्रेंडली गणपती काळी माती आणि गाईच्या शेणापासून यवतमाळ शहरातील आणि रोड स्थित मोठे वडगाव येथे राहणारे निनावे कुटुंबीयांनी राज्य शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवडीला सहकार्य करा असा संदेश देत पाणी आडवा पाणी जिरवा वृक्ष लावा व त्याचे संवर्धन करा असा पर्यावरणपूरक सुंदरसा देखावा त्यांनी तयार केला आहे.महाराष्ट्र शासनाने सन 2017 मध्ये 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला ह्यातूनच ही संकल्पना सुचली असल्याचे यावेळी बोलताना गणेश निनावे यांनी सांगितले मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यातील कधी न झाली अशी भीषण पाणीटंचाईची झळ यवतमाळ करांना सोसावी लागली ह्यातूनच महाराष्ट्र सरकारचे 50 कोटी वृक्ष लागवडीची जनजागृती करीत निनावे कुटुंबीयांनी वनविभागाने वनजमिनीवरील वृक्ष वृक्षलागवडीचा हुबेहूब देखावा घरीच तयार केला आहे.हा देखावा तयार करण्यासाठी तीन दिवस लागले असून यामध्ये काळी माती आणि गाईच्या शेणाचा वापर करण्यात आला आहे गणेश मूर्ती स्थापनेची परंपरा ही गेल्या 56 वर्षापासून असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वृक्ष लागवड व संवर्धन केल्याने येणाऱ्या काळात पाण्याचा कधीच दुष्काळ पडणार नाही वृक्षलागवड व वृक्षाचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्याचे निनावे परिवाराने आवाहन केले आहे.

Post a comment

 
Top