0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग आणि दुबईतील ईमार या कंपनीदरम्यान 'इंडिया- युएई'फुड कॉरिडॉर स्थापनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहकार्य करार करण्यात आला.सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या कराराप्रसंगी उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अन्बलगन, ईमारचे मुख्य कार्यकारी अधिकारी हदी बाद्री, भारतातील प्रमुख गौरव वाधवा, गोपाल सरमा आदी उपस्थित होते.
या करारानुसार ईमार कंपनी कृषी, कृषी प्रक्रिया उद्योग, फलोत्पादन अशा क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ईमारच्या महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रातील स्वारस्याचे स्वागत केले. या गुंतवणुकीमुळे रोजगार संधी उपलब्ध होतील. तसेच कृषी औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्र विस्तारास प्रोत्साहन मिळणार आहे. त्याबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.

Post a comment

 
Top