0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – वर्धा |
जिल्ह्यातील हिंगणघाट येथिल महावीर भवन जवळील मिलन शॉपिंग मॉलमध्ये आग लागली. पहाटे चार वाजताच्या सुमारास शॉट सर्कीटने ही दुर्घटना घडली. आगीमध्ये वृध्द महिला शांताबाई मुथ्था (वय 80) यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर मॉल मालक विजय मुथ्था जखमी झाले आहेत. या आगीत मॉस जळून भस्मसात झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.मिलन शॉपिंग मॉलमधून पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आगीचे लोट निघताना दिसताच नागरिकांनी प्रसंग अवधान दाखवत सूचना दिल्या. नागरिकांनी मॉलच्या वरच्या मजल्यावर झोपेत असलेल्या विजय मुथ्था यांच्या परीवाराला बाहेर काढले. मात्र या वेळी त्यांची आई शांताबाई मुथ्था (वय 80) या घरातच राहिल्याने त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

Post a comment

 
Top