0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – उरण |
आज सकाळी ०७:०० वाजताच्या सुमारास उरण येथे ओएनजीसी गँस प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे. सदर घटनास्थळी सिडको, जेएनपीटी, ओएनजीसी व पनवेल अग्नीशमन दलाचे एकूण ४ फायरवाहन व २ वॉटर टँकर उपस्थित आहे. सदरची आग विझविण्याचे अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षतेसाठी जवळपासचा १ किमी. चा परिसर बंद करण्यात आला आहे. सदर घटनेत ओएनजीसीचे १ कर्मचारी व CISF चे ३ कर्मचारी मृत झाले व २ CISF जवान जखमी झाले आहे असे मंत्रालय नियंत्रण कशातून प्राप्त माहितीनुसार अद्ययावत.
मृतांची नावे:
ONGC कर्मचारी
१) सी. एन. राव (वय ५० वर्ष)
 -----------------------
* CISF जवान
१) ई. नायक (वय ४८ वर्ष)
२) एस. पी. कुशवाहा (वय ३६ वर्ष)
३) अम. के. पासवान (वय ३३ वर्ष)
 -----------------------
* जखमींची नावे:
CISF जवान
१) के. आर. महेश
२) राज शिंडू


Post a comment

 
Top