0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – सातारा |
विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत. दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते सत्ताधारी शिवसेना भाजपमध्ये प्रवेश करत आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांचा भाजप प्रवेश हा जवळपास निश्चित मानला जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजेंची मनधरणी करण्यासाठी खासदार अमोल कोल्हेंना पाठवल्याचेही वृत्त आहे. अमोल कोल्हे आणि उदयनराजेंची प्रदिर्घ चर्चाही झाली. मात्र, उदयनराजेंचे समाधान झालेले नसल्याचे चित्र दिसत आहे. आता या सर्व चर्चांनंतर पहिल्यांदाच उदयनराजेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.
उदनराजे भोसले म्हणाले की 'माझ्या अटींवर मी प्रवेश करेल. मी काय करावे आणि काय करु नये हे दुसऱ्या कुणीही सांगू नये. मला काय करायचे आहे ते मी ठरवणार आहे. मला शोभेल असे आणि लोकहिताच्या अटी मान्य झाल्यास मी निर्णय घेईल. तसेच शेतकऱ्यांसाठी विमा योजनेची अट आहे. मी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती. त्यांनी ठरवून मला सांगाव. जायचं असेल तर हो, नसेल तर नाही.'

Post a comment

 
Top