BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - मुंबई ।
देवसेवा प्रतिष्ठानचा पहिला महाराष्ट्र राज्यस्तरीय नवी मुंबई लघू चित्रपट
फेस्टिवल सोहळा दिनांक १३, १४ आणि १५ सप्टेंबर रोजी गावदेवी मंदिर , मराठी शाळेच्या
मागे, सेक्टर २३, जुईनगर पश्चिम येथे नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक मा.कृष्णा
धुमाळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून या सोहळ्याचा शुभारंभ केला तर संस्थेचे संस्थापक
माननीय देविदास सोनावणे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून देवसेवा प्रतिष्ठान
या संस्थेविषयी उपस्थितांना माहिती सांगून संस्थेच्या भविष्यातील कार्याचा आढावा घेतला
या शुभप्रसंगी प्रमुख अतिथि म्हणुन
प्रसिद्ध सिने-नाट्य कलाकार मा.जयराज नायर , संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.दिपाली सोनावणे
, फेस्टिवल दिग्दर्शक गौरव शिंदे , फेस्टिवल टीम सर्वश्री आकाश उजगरे , सोमनाथ लोहार
, राजेश काळे, विजय कदम , देवांग शेळके, श्वेता सोनावणे , अश्लेशा सोनावणे , आदी संस्थेचे
मानद सदस्य उपस्थित होते. मान्यवरांनी संस्थेविषयी आपले मतप्रदर्शन मांडले.या भव्य
अशा लघू चित्रपट सोहळ्यात जवळजवळ महाराष्ट्र स्तरातुन १५० ते २०० लघू चित्रपट सहभागी
झाले होते. संस्थेतर्फे प्रत्येक लघू चित्रपटाला सहभागी म्हणुन सन्मानचिन्ह प्रदान
करून त्यांना प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर माननीय सौ.सविता सुरेश
डाळे निर्मित अनंत सुतार लिखित-दिग्दर्शित " गुमसूम " महेश्वर भिकाजी तेटांबे
लिखित-दिग्दर्शित " अर्थस्वार्थ " आणि मनिष मेहेर लिखित-दिग्दर्शित
" कडवा सच " या तीन लघू चित्रपटांना देखील मान्यवरांच्याहस्ते " विशेष
ज्युरी " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेत्री
उषा साटम आणि अभिनेते-निर्माते सुरेश डाळे यांना त्यांनी सिने-नाट्य क्षेत्रांत दिलेल्या
योगदानाबद्दल प्रसिद्ध अभिनेते जयराज नायर यांच्या हस्ते त्यांना "कला गौरव " पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात
आले. या संपुर्ण सोहळ्याचे संचालन फेस्टिवल दिग्दर्शक मा.गौरव शिंद े यांनी केले असून
या संस्थेच्या माध्यमातुन जे काही लघू चित्रपट सहभागी होते त्या चित्रपटांतील सर्व
कलावंतांना आगामी मोठ्या चित्रपटांत संधी उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासनही त्यांनी
दिले. या संपुर्ण लघू चित्रपट सोहळ्याचे परीक्षण मा.लक्ष्मी पंधे आणि विरेंद्र रत्ने
यांनी केले.तसेच संस्थेचे संस्थापक मा.सोनावणे
आणि दिग्दर्शक गौरव शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून ह्या पहिल्या वाहिल्या
महाराष्ट्र राज्यस्तरीय लघू चित्रपट सोहळ्याची सांगता केली.
Post a comment