0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
मुरबाड तालुक्यात हायटेक रस्ते बनवून विकास करण्याची भिम गर्जना करण्यात मशहुर असलेल्या भाजप सरकारने कोट्यवधींचा निधी मंजूर करून खर्च देखील करण्यात आला.परंतु मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशःहा चाळण झालेली निदर्शनास येत आहे.अनेक रस्त्यातुन चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.सन.२०१८ ते २०२९ च्या कालावधीतील ३०/५४ मधील फंडातून सायले साजगाव (शिळघर) साखरे रस्त्यासाठी पंचवीस लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. सायले  साजगाव,  साखरे  या परीसरातील नागरिकांना रहदारी साठी या रस्त्याला प्राधान्य देण्यात आले.परंतु भ्रष्टाचारात हातखंडा असलेल्या ठेकेदाराने रस्त्याचे काम अत्यंत खराब केल्याने सहा महिन्यांत रस्त्याची वाताहात झाली असुन संपूर्ण रस्ता खड्ड्यात गेल्या सारखा झाला आहे. रस्त्या मध्ये अनेक ठिकाणी खडी ऊखडली गेली आहे.जागो जागी पाणी साठल्याने  शाळकरी मुलांना शाळेत जायला त्रासदायक होत आहे.काम चालु असताना तक्रारी अर्ज केला असता शासकीय अधिकाऱ्यांनी तक्रारींची दखल घेतली नाही परीणामी खराब काम करणाऱ्या ठेकेदाराचे शासकीय अधिकाऱ्यांशी अर्थपुर्ण संबंध आहेत असे निदर्शनास येवु लागले खेद जनक बाब म्हणजे भाजप पक्षाचे तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव हे महाशय याच गावात राहात असुन त्याकडे ते जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत आहेत.म्हणुन संबंधित खात्याचे कार्यकारी अभियंता ऊप अभियंता कनिष्ठ अभियंता, तक्रारी अर्जाला भिक घालत नाहीत तरी भ्रष्ट ठेकेदार संबंधित अधिकारी तसेच गुणनियंत्रण कक्ष या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी परीसरातील नागरिकांन कडुन करण्यात येत आहे.

Post a comment

 
Top