BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - नवी दिल्ली ।
इराणच्या हुती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या अरामको तेल कंपनीच्या दोन
तेल क्षेत्रांवर ड्रोन हल्ले केल्यानंतर आता कच्च्या तेलाच्या किंमतीत टक्के वाढ झाली
आहे. बंडखोरांनी अबाकिक आणि खुराइस येथील तेल क्षेत्रांवर हवाई हल्ले केल्यानंतर सौदी
अरेबियाने ५० टक्के तेल उत्पादन थांबण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया हा जगभरात तेल निर्यात
करणारा मोठा देश आहे. दररोज साधारण ९८ दशलक्ष बॅरल कच्चे तेल सौदी अरेबियेतून निर्यात
होते. या निर्णयामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्याने तेलटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे
खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतीतही एका रात्रीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Post a comment