0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - मुंबर्इ ।
चार वर्षांच्या चिमुरडीच्या इच्छाशक्तीपुढे कॅन्सरने हात टेकले, मात्र नियतीला तिच्या आयुष्याची बळकट होणारी दोर पाहवली नाही. कर्करोगाच्या उपचारांसाठी वाशिमहून मुंबईत आलेल्या चिमुकलीचा लोकलमधून खाली पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.मूळ वाशिमच्या असलेल्या चार वर्षांच्या नेहा ठगे हिला काही महिन्यांपूर्वीच कर्करोगाचं निदान झालं होतं. केमोथेरपीसारख्या उपचारांसाठी नेहाच्या पालकांनी तिला घेऊन मुंबई गाठली. ठणठणीत बरं होऊन विदर्भातील आपल्या छोट्याशा गावी परत जाऊ, या आशेने नेहा सर्व उपचार निमूटपणे सहन करत होती.गेल्या आठवड्यात नेहाचे आई-वडील विदर्भात परतले, मात्र त्यांच्या काळजाचा तुकडा काळाने हिरावून नेला होता. चेंबुरमध्ये गर्दीने भरलेल्या लोकलमधून पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या नेहाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

Post a comment

 
Top