0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – अकोले |
'पिचड यांना उमेदवारी देऊ नका... महापोर्टल त्वरित बंद करा... महिलांवर होणाऱ्या अत्याचाराकडे लक्ष द्या', अशी मागणी करत एका युवतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीवर शाईचा फुगा फेकल्याची घटना घडली आहे. शर्मिला येवले असे या तरूणीचे नाव असून ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ता असल्याचे समजते. अकोले येथे हा प्रकार घडला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला शुक्रवारी नगरमधून सुरू झाली. त्याचदरम्यान एका तरुणीचा उद्रेक झाला. तिने 'सीएम गो बॅक'च्या घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीवर शाईचा फुगा फेकला. 

Post a comment

 
Top