0
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही परंपरा जोपासणारे मुरबाड तालुक्यातील नामवंत मुर्तीकार सदानांद शेटकर  गौरी गणपती सणात शेकडो गणपती गौरी मुर्ती घडविले आहेत.त्यांच्या हाताची जादू मुर्ती साक्षातकार देवाच्या अवतारामध्ये उतरल्याचे सांगून जाते.त्यांनी आजपर्यंत विविध अशा सुबक व आकर्षक मुर्ती बनविल्या असून गणपती,गौरी,दुर्गा माता व अन्य अशा मुर्तींचा समावेश आहे.त्यांच्या आकर्षकाची किमया मुर्तीत जीव आणणारी आहे त्यामुळे पि.यु.पी तसेच मातीपासून बनविण्यात येनार्‍या मुर्तीला जास्त  मिळत आहे.त्यांच्या मुर्ती कलाकाराबरोबर विविध अशा डेकोरेशनचीही कामे करून देण्यात येत असून विविध कलागुणांनी सदानंद शेटकर यांचे नाव आज तालुक्यातून जिल्हयात गेले आहेत.कित्येक वर्षे मुर्ती घडविणार्‍या शेटकर कुटूंबात त्यांची पत्नी,मुलगा यांनीही मुर्तीकार म्हणून परंपरा जोपासली आहे.त्यांनी केलली मुर्ती,दिलेला आकार,कलर यामुळे नागरिकांना आवडणारी वाव ठरत आहे.अशा सदानंद शेटकरांच्या कलेची चर्चा  मुर्तीकार म्हणून सर्वत्र ओळख बनली आहे.


Post a comment

 
Top