0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
गणेशोत्सव साजरा करताना जलशक्ती आणि जलस्त्रोताला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी निर्माल्यासह प्लॅस्टिक जाणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. यात स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड संस्थेतर्फे आयोजित राज्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात ॲड. शेलार बोलत होते. यावेळी सन 2016-2017 साठी अहमदपुर लातूरचे  धुंडिराज लोहारे सन 2017-2018 साठी नांदेड येथील दिगंबर फुलारी  यांना प्रा. बापूसाहेब टी. पी. महाले जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच स्काऊट गाईडस् अभ्यासक्रमातील राज्य पुरस्कार, स्काऊट गाईड प्रमाणपत्र, बार टू मेडल ऑफ मेरीट या पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले.

Post a comment

 
Top