0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह – मेहकर, बुलडाणा
येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. मेहकर तालुक्यातील माळेगाव येथील ही घटना आहे. आईसह 4 मुलींचा मृतदेह विहिरीत आढळला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मृतांमध्ये उज्वला ढोके, ( वय 35) वैष्णवी ढोके (वय 9) दुर्गा ढोके (वय 7), आरुषी ढोके (वय 4) पल्लवी धोके (वय 1) यांचा समावेश आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या की हत्या याचा अद्यापही उलगडा झालेला नाही.घटनेची माहिती मिळता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या मायलेकींनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली हा घातपात आहे याचा तपास पोलीस करत आहेत. 

Post a comment

 
Top