0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह – बुलडाणा ।
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील इमामवाडा परिसरात राहणारे शेख कुटुंब गाढ झोपेत असताना अचानक घराशेजारील घराची भिंत कोसळली आणि शेख कुटुंबातील 3 जनांचा जागीच मृत्यू झालाय , तर दोघे गंभीर झाले असून मेहकर च्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत ही घटना रात्रीं 2 वाजेच्या दरम्यान मुसळधार पाऊस सुरु असताना घडली.काल दिवसभर बुलडाणा जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच होती, नंतर रात्रीपासून जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे, तेव्हा जिल्ह्यातील मेहकर येथील इमामवाडा चौकात राहणारे शेख कुटुंब गाढ़ झोपेत असताना रात्रि 2 वाजे दरम्यान त्यांच्या घराशेजारी असलेल्या घराची जूनि मातीची भिंत शेख कुटुंबावर कोसळली, आणि कुटुंबातील सर्व पाच जन मातीच्या ढिगारयाखाली दबल्या गेले, भिंत कोसळताना मोठा आवाज झाल्याने शेजाऱ्यांनी आरडा ओरड केली आणि मदतीला सुरुवात केली तात्काळ पोलिसां सह परिसरातील नागरिक घटनास्थळावर धावून आले, मातीखाली दबलेल्या पाच जनाना बाहेर काढून रुग्णालयात भर्ती केले असता डॉक्टरानी पाच पैकी तिन जन मृत घोषित करीत दोघे गंभीर जख्मी असल्याचे सांगितले, जखमी दोघावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात पति, पत्नी सह लहान बालक असे तिनजन मृत घोषित केले यात पत्नी आठ महिन्याची गर्भवती असल्याचे डॉक्टरा नी सांगितले. मृतकांमध्ये 28 वर्षीय शेख असिफ शेख अशरफ, 25 वर्षीय शाहिस्ता बी शेख असिफ आणि 6 वर्षीय जुनेद शेख असिफ हा बालक अशी मृतकांची नावे आहेत.. तर शेख तहेर शेख अशरफ आणि सुजान शेख असिफ ही दोघे जखमी आहेत.


Post a comment

 
Top