0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळामुळे मुंबईतील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.विजू खोटे यांनी ३०० हून अधिक चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. मराठी, हिंदी,गुजराती या भाषांमध्येही त्यांनी काम केले आहे. खोटे यांची 'शोले' सिनेमातली कालियाची भूमिका चांगलीच गाजली होती. 'अंदाज अपना अपना' या आमिर खान आणि सलमान खानच्या प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमातली त्यांची रॉबर्ट ही भूमिका जबरदस्त गाजली होती. विजू खोटे यांच्या मराठी, हिंदी चित्रपटातील, मालिकांमधील भूमिका चांगल्यात गाजल्या. चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान कायमच सर्वांच्या आठवणीत राहणार आहे.

Post a comment

 
Top