0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड,ठाणे |
स्थानिक सत्ताधारी आमदाराच्या शिफारसीने मुरबाड तहसिलदार म्हणुन रूजू झालेले तहसिलदार अमोल कदम स्थानिक पत्रकार यांना निवडणुक प्रक्रियाच्या पत्रकार परिषदेला बोलावले नसल्याने त्यांच्या कारभाराची चौकशी मुख्य निवडणुक आयोगानी करावी अशी मांगणी जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केली आहे.अनेक कामे मनमानीने करतात लोकांची कामे करण्यास लोकांच्या तक्रारी निकाली काढण्यास अपयशी ठरलेले तहसिलदार मुरबाड तालुक्यात राजकारण करत असल्याचा आरोप होत आहे.याचं तहसिलदार कार्यालयातील नायब तहसिलदार विकास गारूडकर यांनी एका वयोवृध्द 85 वर्षीय शेतकर्‍याला सामनेवाला हजर नसताना जमिनीच्या दाव्यात एकतर्फी निर्णय देवुन शेतकरी कसत असलेल्या पिक पाहाणी लावली असलेल्या शेतीला पिकपहाणी लावू नये असा मनमानी आदेश दिल्याने त्या शेतकर्‍यांनी कोर्टात धाव घेतली आहे.रेती रॉयल्ट्री हप्ते बंगलोधारक अवैध बांधकामे गौणखनिज रेशनिंग धान्य काळाबाजार अशा अनेकावर कारवार्इ करत नाहीत त्याच्याकडुन हप्ते घेवुन हात मिळवणी करतात की काय असा संशय असुन तहसिलदार नायब तहसिलदार निवडणुक प्रक्रिया यशस्वीपुर्ण करतील काय असा सवाल मतदारानी उपस्थित केल्याने या अधिकार्‍यांच्या तात्काळ बदल्या करायाला हव्यात असेही तक्रार वरिष्ठाकडे करण्यात आली आहे.

Post a comment

 
Top