0
BY -  मयुर जाधव,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड / ठाणे |
मुरबाड ग्रामीण रूग्णालयातील एका परिचारिकेने डॉक्टराविरोधात विनयभंगाची तक्रार मुरबाड पोलिसांत केली असून मुरबाड पोलिस अधिकार्‍याने तक्रार अर्जाला केराची टोपली दाखवल्याने पोलिसांचा महिलांनी निषेध केला आहे.
            अन्यायग्रस्त परिचारिकेच्या तक्रारीनुसार कारवार्इ झाली पाहिजे अशी मागणी आर.पी.आय सेक्युलरचे युवा नेते रविंद्र चंदने यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निवेदन देेऊन केली असून महिलांचा विनयभंग अन्य तक्रारीकडै मुरबाड पोलिस दुर्लक्ष करून प्रकरणे तडजोडीने आरोपीतांना साथ देत आहेत अशा अधिकार्‍यात्त्ंना तात्काळ निलंबीत करा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
            याच मुरबाड पोलिस अधिकार्‍याने मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महिला व्यापारी गाळे धारकास चेअरमन  व सचिवांच्या सांगण्यावरून समजपत्र काढले होते.पोलिसांचा काहीही संबंध नसताना दबावतंत्र वापरला परंतू शासकीय महिला परिचारिकेचा विनयभंग झाल्याची स्वतः महिलेने तक्रार केली त्याकडे पोलिस अधिक्षिक ठाणे,मुरबाड पोलिस अधिकारी यांनी दुर्लक्ष केले तसेच ठाणे सिव्हिल अधिकारी यांनीही दुर्लक्ष केल्याने महिलांनी सरकारचाही निषेध केला असुन महिला बंगडयांचा आहेर देणार असल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी दिल्या आहेत.
      भाजपा - सेना सरकार भ्रष्टाचार,काळाबाजर,ठेकेदार यांना बळ देऊन पाठिशी घालत आहेत त्याचबरोबर आता महिलांवर अत्याचार करणार्‍यांनाही पाठिशी घालतात असे समोर आले असून 20 दिवस झाले तक्रारीची चौकशी झाली नसल्याने पोलिसांच्या मनमानी गैरकारभाराविरोधात तीव्र आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.


Post a comment

 
Top