BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
पार्सल देण्यासाठी मातोश्रीवर गेला अन् हा या
पठ्ठ्याची थेट तुरुंगात रवानगी झाली. ऑनलाईन शॉपिंगच्या नावाने फसवणूक करणारे अनेक
उदाहरणे आपण यापूर्वी पाहिले आहे. मात्र एकाने चक्क युवासेना प्रमुख आदित्य
ठाकरेंची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. तो ऑनलाईन शॉपिंगवर ऑर्डर न केलेल्या
वस्तू आदित्य ठाकरे यांच्या नावाने 'मातोश्री'वर खपवायचा. एका बड्या ऑनलाईन
कंपनीच्या डिलेव्हरी बॉयला खेरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाचे
म्हणजे यापूर्वी त्याने चार वेळा या प्रकारे पार्सल पाठवून 'मातोश्री'च्या
कर्मचाऱ्यांकडून अधिक पैसे उकळल्याचे समोर आले आहे. मात्र पाचव्यांदा त्याचा हा
प्रयत्न फसला आणि त्याला तुरुंगात जावे लागले.धीरेन मोरे (20) असे या डिलेव्हरी
बॉयचे नाव आहे. तो एका बड्या ऑनलाईन शॉपिंग कंपनीत डिलेव्हरी बॉय म्हणून नोकरी
करायचा. धीरेन हा ग्राहकांच्या नावाने पार्सल तयार करून त्या पार्सलमध्ये कमी
किमतीच्या वस्तू पॅक करायचा. ग्राहकांकडून त्या वस्तूंची मोठी रक्कम वसूल करायचा.
धीरेनने सुरुवातीला लहानसहान ग्राहकांना फसवले. यानंतर त्याने थेट मातोश्रीवर मजल
मारली होती. यापूर्वी त्यांने मोतोश्रीवर जाऊन चार वेळा खोट्या वस्तू फसवल्या आणि
यात त्याला यशही मिळाले. मात्र पाचव्या वेळी तो अडकला. कमी किमतीचे हेडफोन्स आणि
इतर साहित्य धिरेन याने जास्त रक्कम वसुल केली होती. मात्र आज चक्क आदित्य
ठाकरेंशी त्याची गाठ पडली. यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्याच्यावर खेरवाडी
पोलीस ठाण्यात फडवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
Post a comment