0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह – मुंबई ।
देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या अनेक ठिकाणी गॅस गळतीच्या तक्रारी आल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर मुंबई महानगर पालिकेने (BMC) यासंबंधित सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा  दिला आहे. ज्या भागातून गॅस गळती झाल्याच्या तक्रारी आल्या त्या भागात तात्काळ 9 अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या.मुंबईतील राष्ट्रीय रासायनिक खतांच्या चेंबूर यंत्रणेतून गॅस गळती होत असल्याची तक्रार आली होती. स्थानिक रहिवाशांना या भागात मोठ्या प्रमाणात गॅसचा वास येत असल्याने ही तक्रार केल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर काही वेळातच एकच गोंधळ उडाला. मात्र, काहीवेळेतच महानगर गॅस लिमिटेडने यावर स्पष्टीकरण दिले. आतापर्यंतच्या तपासात कोणत्याही पाईपलाईनमधून गॅस गळती झाल्याचं स्पष्ट झालेलं नसल्याचं एमजीएलने सांगितलं.

Post a comment

 
Top