0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
संस्कार प्रतिष्ठान व डॉ डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी यांनी गणेशोत्सव २०१८ मध्ये चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत विशेष पोलीस अधिकारी म्हणुन संपुर्ण ११ दिवस  मदत केल्याबद्दल अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे साहेब यांच्या हस्ते १२० जणांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पोकळे साहेब म्हणाले बंदोबस्त करताना बेवारस वस्तुला हात लाऊ नका,बेवारस वाहनाला हात लाऊ नका,संशयीत व्यक्तिवर लक्ष ठेवा असे काही आढळून आल्यास पोलीसांच्या निदर्शनास आणून द्यावे
यावेळी पोलीस उपायुक्त स्मिता पाटील,सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव उपस्थित होते प्रास्तविक डॉ मोहन गायकवाड यांनी केले आभार चिंंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे यांनी मानले सुत्रसंचलन नम्रता बांदल यांनी केले

Post a comment

 
Top