0
BY - युवा महाराष्ट्र लाइव |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मोदींना ग्लोबल गोलकीपर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. जगप्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांच्या हस्ते मोदींना गौरवण्यात आलं. स्वच्छतेसाठी घेतलेले निर्णय आणि राबवलेल्या योजना यासाठी मोदींना हा पुरस्कार देण्यात आला. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या वतीनं मोदींना ग्लोबल गोलकीपर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Post a comment

 
Top