0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
विधानसभेच्या निवडणूकीची धामधूम सुरू झाली असून अनेक पक्षाचे नेते निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चिन्ह दिसून येत असून मुरबाड विधानसभा मतदार संघातुन राष्ट्रवादीचे बालेकिल्ला म्हणून प्रमोद हिंदुराव यांचे नाव सध्या चर्चेत आहे.गल्ली ते दिल्ली ज्यांनी राष्ट्रवादी गाजवली असे माजी सिडकोध्यक्ष प्रमोद हिंदुराव हे मुरबाड विधानसभेतून निवडणूक लढविणार असल्याचे सुत्रांकडून कळाले आहे.नेहमी कार्याच्या वेगाला गती देणारे प्रमोद हिंदुराव यांचा विविध कार्यशील प्रगतीवर सिंहाचा वाटा ठरला आहे.पुरग्रस्त असो कि समस्याग्रस्त,बेरोजगार असो कि शासनाच्या सुविधा नेहमी तळागळतील लोकांपर्यंत नेऊन सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून जनतेची सेवा करणारे प्रमोद हिंदुराव हे नाव समोर आले आहे.अवघ्या कालावधीत थेट शरद पवार यांच्या आशिर्वदाने राष्ट्रवादी वाढवली.अशा राष्ट्रवादीतून गेलेल्यांना येत्या निवडणूकीत  " राष्ट्रवादी पुन्हा " अशी गर्जना करत पुन्हा बाजी राष्ट्रवादीच मारणार असा विश्‍वास प्रमोद हिंदुराव यांनी युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केला आहे." किती जरी गेले,राष्ट्रवादी निर्माण करेल नवे तरूण चेहरे " असेही प्रमोद हिंदुराव यांनी वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले.याच वक्तव्यामुळे मुरबाडच्या राष्ट्रवादीतून एकमेव उगवता तारा म्हणून प्रमोद हिंदुराव आहेत जे गेलेले दिवस येत्या विधानसभेच्या जिंकण्याच्या माध्यमातून दाखवून देतील असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.पैसा माणूसकीपेक्षा मोठा नाही,कारण सर्वकाळ राहते ती माणूसकी पैसा नव्हे अशा प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिल्या.त्यामुळे मुरबाड विधानसभा मतदार संघातील निवडणूका या अटीतटीच्या होणार असून कोणता पक्ष,कोणता नेता प्रमोद हिंदुराव यांना चॅलेंज करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Post a comment

 
Top