0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
दरवर्षी विधानसभा निवडणुका मुरबाड विधानसभा श्रेत्रात रंगतदार होतात यांनी काय केलं तुम्ही काय करणार विविध समस्याचा पाढा गाजत होता परंन्तु येत्या निवडणुकीत सारं मोहाळ शांत आहे.सदरची निवडणुक विकास कामाची वर्गवारी ठरणार आहे.दरवर्षी ठेकेदारी टक्केवारी भ्रष्टाचार अन्याय अत्याचाराचा मुद्दा घेवुन येणारी यावेळी विकासांच्या कंपाऊन्ड मध्ये कोंबुन राहिल्याने मतदारासमोर मुद्दे काय नेणार येथे राज्य देशाचा जिल्हयाचा मुद्दा चालत नाही स्थानिक मुदयाना जास्त प्राधान्य दिलं जातंय.मुरबाडमध्ये मच्छीमार्केट आग्नीशमक दल पंचायत समिती तहसिलदार ग्रामीण रूग्णालय टामाकेअरसेंन्टर खुल्ले नाटयगृह भव्य बाजारपेठ आश्‍वरूढशिवाजी स्मारक सुसज्ज शिवाजीचौक भव्य पोलिस ठाणे इमारत गोडावुन एसटी स्टॅन्ड इमारत पाणीपुरवठा योजना व्यायामशाळा स्मशानभुमी गांव तेथे रस्ता बारवीधरण ग्रस्त पुर्नवसन दारूबंदी गांवागांवातील भानगडीबंद विद्युत स्विचिंगस्टेशन वाचनालय नॅशनल हायवे पर्यटनस्थळे यासह हजारो कोटींची कामे आमदार किसनराव कथोरे यांच्या कालावधीत झाल्याने मुरबाड विधानसभेत मतदार स्तब्ध झाले आहेत.मुरबाड विधानसभेत विकास राहिला नाही.अशा आवस्थेत कोणते मुद्दे विरोधक मतदार जनतेसमोर मांडणार अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.मुरबाड विधानसभेत आज पर्यंत सेनाभाजपा युती विरोधात काँगे्रस राष्ट्रवादी अशी लढत झाली आहे.तदनंतर सेना भाजपा काँगे्रसराष्ट्रवादी मनसे अशी लढत झाली आहे.येणार्‍या निवडणुकीत आमदार किसनराव कथोरे यांच्या विरोधात तगडा उमेदवार भाजपाशिवाय कोणाकडेच नाही त्यामुळे मुरबाड विधानसभा बिनविरोध झाल्यास आर्श्‍चय नको नुकतेच राष्ट्रवादीचा बारूज सेनेत दाखल झाला भाजपा सेना युती झाल्यास भाजपाचे विद्यमान आमदार किसनराव कथोरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँगे्रस कोणाला रणगणांत उतरवते याची कुजबुज सुरू आहे.पक्षनिष्ठा नेतेनिष्ठा अर्थिकरण समाजकरण नातीगोती मुरबाडचा आमदार ठरवत असते पंरन्तु पक्षांतर गटतटाच्या मार्गातून राजकारणात अर्थिकबाजुने काहीही घडतंय यामध्ये विकासाच्या कामाची वर्गवारी ठरणार की पुन्हा काही वेगळा रंग याकडे मतदाराचं लक्ष लागुन आहे.

Post a comment

 
Top