0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – सातारा  |
राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात गळती सुरू असताना खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या भूमिकेने पक्षाच्या अडचणींमध्ये वाढच झाली आहे. यात खासदार अमोल कोल्हेंनी देखील शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचाही उपयोगी झाला नाही. उदयनराजेंनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुनच अंतिम निर्णय घेणार असल्याचं म्हटलं. आज ही महत्त्वाची बैठक होत आहे. त्यामुळे उदयनराजे भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीतच राहणार याविषयीचा अंतिम निर्णय लवकरच होणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी 11 वाजता पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. मात्र, बैठकीच्या ठिकाणाबद्दल गोपनीयता पाळण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीनंतर उदयनराजे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Post a comment

 
Top