0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – कोलकाता |
मोहम्मद शमी विरूद्ध घरगुती हिंसाचारबद्दल कोलकाताच्या अलीपूर न्यायालयाने अटक वारंट जारी केले आहे. घरगुती हिंसाचारबद्दल शमीच्या पत्नीने त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
न्यायालयाच्या या आदेशानंतर शमीकडे या खटल्यात जामीन मिळवण्यासाठी १५ दिवसांची मुदत आहे. १५ दिवसांच्या आत त्यांना जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल करायचा आहे. २००८ मध्ये शमी यांची पत्नी हसीन जहान यांनी शमीविरोधात घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले होते. त्यानंतर शमी आणि त्याच्या भावावर घरगुती हिंसाचारबद्दल आय.पी.सी च्या कलम ४९८ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Post a comment

 
Top